-
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेंत्रीपैकी एक आहे. बॉलिवूडमधील कारकीर्दीत प्रियांकाचं काही अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं होतं. अभिनेता शाहिद कपूरबरोबर प्रियांकाच्या अफेयरच्या चर्चा होत्या.
-
२०११ साली आयकर विभागाकडून प्रियांकाच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.
-
आयकर विभागाचे अधिकारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तेव्हा शाहिद कपूरने दरवाजा उघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
एवढंच नव्हे तर, तेव्हा शाहिदच्या अंगावर फक्त टॉवेल असल्याचंही वृत्त होतं. याबाबत प्रियांकाने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
-
‘इंडिया टीव्ही’च्या ‘आपकी की अदालत’मध्ये दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने या वृत्तावर संताप व्यक्त करत नेमकं काय घडलं ते सांगितलं होतं.
-
“दरवाजा ठोठावल्यानंतर घरातील व्यक्ती दरवाजा उघडते. माझ्या घरात काम करणाऱ्या बाईने दरवाजा उघडला होता, ” असं ती म्हणाली होती.
-
“परंतु, शाहिद कपूरने दरवाजा उघडला अशी अफवा सगळीकडे पसरवण्यात आली.”
-
“मी एक मुलगी आहे. कोणत्याही मुलीबद्दल असं बोलणं, चुकीचं आहे. ज्या महिला व मुली इथे बसल्या आहेत. त्यांना माझ्या भावना समजत असतील.”
-
“कोणतेही पुरावे नसताना आणि मुळात अशी गोष्ट झालेलीच नाही, त्याबाबत तुम्ही चुकीची माहिती कशी देऊ शकता? मी कोणाची तरी मुलगी व बहीण आहे,” असंही प्रियांका म्हणाली होती.
-
प्रियाकांने घडलेल्या प्रसंगाचा घटनाक्रमही सांगितला होता.
-
प्रियांका म्हणालेली, “मी माझ्या आईवडिलांबरोबर राहते. जेव्हा आयकर विभागाचे अधिकारी माझ्या घरी आले, तेव्हा माझी आई घरी नव्हती.”
-
“माझ्या आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी ती झारखंडला गेली होती. माझ्या वडिलांना सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं, म्हणून ते दुसऱ्या घरी होते.”
-
“शाहिद कपूर माझ्या घरापासून फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर राहतो,” असं तिने सांगितलं होतं.
-
मी इतर कुणाला फोन केला असता, तर त्यांना यायला २०-२५ मिनिटे लागली असती.”
-
“म्हणून मी शाहिदला फोन केला. आणि अधिकाऱ्यांनीही त्याला घरात थांबण्याची परवानगी दिली. या गोष्टीला मी कधीही नाकारलेलं नाही,” असंही पुढे प्रियांकाने सांगितलं होतं.
-
दरम्यान, प्रियांकाने २०१८मध्ये निक जोनसबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना मालती ही मुलगी आहे.
-
(सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम, प्रियांका चोप्रा/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख