-
बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची सावली बनून राहणारा बॉडीगार्ड शेरा अनेकदा चर्चेत असतो
-
गेल्या २८ वर्षांपासून शेरा सलमानसोबत त्याच्या सावलीसारखा वावरत आहे. १९९५ पासून तो सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम पाहत आहे.
-
शेराची सलमानबाबतची आत्मियताही कधी लपली नाही. ‘सलमान खानसोबत मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहीन,’ असे शेराने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे.
-
मी कधीही भाईजानच्या मागे उभा राहत नाही. तर नेहमीच त्याच्या पुढे उभा राहतो. जेणेकरुन त्याच्यावर येणारं संकट मी माझ्यावर घेईन असंही तो म्हणाला होता.
-
सलमानसाठी शेराची निवड सोहेल खानने केली होती. १९९५ मध्ये एका पार्टीत सलमान आणि सोहेल खानची ओळख शेराशी झाली.
-
या पार्टीनंतर सलमान चंदीगढला गेला असता चाहत्यांच्या गराड्यात तो पुरता अडकला होता. -
त्यावेळी सलमानला सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचे सोहेलला जाणवले.
-
तेव्हा सोहेलने शेराला संपर्क केला. तेव्हापासून शेरा हा खान कुटुंबाचाच एक भाग झाला.
-
शेराने १९९३ मध्ये टायगर सिक्युरिटी नावाने सुरक्षा रक्षक पुरवणारी एक कंपनी स्थापन केली होती.
-
शेराशी करार करताना सोहेलने त्याला माझ्या भावासोबत कायम राहशील का असा प्रश्न विचारला होता.
-
माझा मालकच माझ्यासाठी सर्वकाही आहे. तो माझा देवच आहे. मालक जिकडे जाईल त्यांच्यासोबत मी कायम असेन, असं शेरानं म्हटलं होतं.
-
शेराचे मूळ नाव गुरमीत सिंह जॉली आहे. शेराचा जन्म एका शिख कुटुंबात झाला. शेराचे लहानपणी शिक्षणात फारसे मन रमले नाही.
-
कसे- बसे त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शेराने पहिल्यापासूनच बॉडीबिल्डींगकडे जास्त लक्ष दिले. शेरा अनेकदा सलमानसाठी तुरूंगातही गेला आहे.
-
माध्यमांच्या रिपोर्टनुसार सलमानची २४ तास सुरक्षा करण्यासाठी शेराला वर्षाकाठी २ करोड रुपये पगार मिळतो. -
म्हणजे १६.५० लाख रुपये महिन्याला दिले जातात.

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य