-
चाहत्यांचे त्यांच्या आवडत्या स्टार्सवर प्रेम नेहमीच जास्त राहिले आहे. आपल्या आवडत्या स्टार्ससाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते वेगवेगळे मार्ग शोधत असतात. त्यांचे प्रेम दाखवण्यासाठी चाहत्यांनी त्यांची मंदिरे बांधली आहेत, जिथे त्यांची पूजा केली जाते. चला जाणून घेऊया त्या मंदिरांबद्दल जिथे या कलाकारांची पूजा केली जाते.
-
अमिताभ बच्चन –
कोलकात्याच्या आनंद नगरीमध्ये अमिताभ बच्चन यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. त्यांचे मंदिर ‘बच्चन धाम’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात त्यांची मूर्ती आणि फोटो बसवण्यात आले आहेत. देवाची जशी पूजा केली जाते तशीच पूजा त्यांच्या मंदिरात केली जाते. (फोटो: अमिताभ बच्चन/फेसबुक) -
हंसिका मोटवानी
हंसिका मोटवानीने २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरियलमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये काम करताना ती केवळ १२ वर्षांची होती. या शोशिवाय ती अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली. साऊथमध्ये हंसिकाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनीही तिच्यासाठी मदुराईमध्ये तिच्या नावाचे मंदिर बांधले असून येथे तिचा पुतळाही बसवण्यात आला आहे. (फोटो: हंसिका मोटवानी/फेसबुक) -
ममता कुलकर्णी –
१९९२ मध्ये ममता कुलकर्णी ‘प्रेम शिकारम’ या चित्रपटात दिसली, ज्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले. ममताची साऊथमध्ये फॅन फॉलोइंग इतकी वाढली होती की तिच्या चाहत्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये तिच्यासाठी मंदिर बांधलं होतं. (फोटो: @mamtakulkarni201972_official/instagram) -
निधी अग्रवाल –
निधी अग्रवालची फॅन फॉलोइंग साऊथमध्ये खूप जास्त आहे. दोन चित्रपट केल्यानंतर २०२१ मध्ये चाहत्यांनी चेन्नईमध्ये तिचे मंदिर बांधले आणि तिची पूजा करण्यास सुरुवात केली. (फोटो: निधी अग्रवाल/फेसबुक) -
नागार्जुन –
टॉलिवूड स्टार अक्किनेनी नागार्जुनच्या चाहत्याने अन्नमय्या चित्रपट पाहिल्यानंतर १९९७ मध्ये अन्नमाचार्य मंदिर बांधले. हे मंदिर बांधण्यासाठी २२ वर्षे लागली. ते बनवण्यासाठी एक कोटींहून अधिक खर्च आला आहे. (फोटो: अक्किनेनी नागार्जुन/फेसबुक) -
नमिता –
नमिताने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना ती इतकी आवडते की २००८ मध्ये चाहत्यांनी तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथे तिचे मंदिर बांधले. (फोटो: नमिता/फेसबुक) -
रजनीकांत –
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची लोकप्रियता सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या नावाने एक मंदिरही बांधले गेले आहे. पण त्यांचे फोटो किंवा मूर्ती या मंदिरात स्थापित केलेली नाही. ‘सहस्र लिंगम’ नावाचे हे मंदिर कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोटिलिंगेशनवर मंदिरात बांधले गेले आहे. (फोटो: रजनीकांत/फेसबुक) -
सोनू सूद –
सोनू सूदने करोना काळात अनेकांना मदत केली. त्यामुळे तेलंगणातील दुब्बा तांडा गावात सोनू सूदचे मंदिर बांधण्यात आले आहे. (फोटो: सोनू सूद/फेसबुक) -
खुशबू सुंदर –
खुशबूने १९८८ मध्ये ‘धर्मथिन थलायवन’ या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. खुशबू ही साऊथची पहिली अभिनेत्री आहे, जिचे चाहत्यांनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे मंदिर बांधले. मात्र तिच्या काही वक्तव्याचा राग आल्यानंतर चाहत्यांनी मंदिराची तोडफोड केली होती. (फोटो: खुशबू/फेसबुक)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख