-
नैसर्गिक सौन्दर्य, निखळ हास्य, लाजवाब अभिनय यासाठी लोकप्रिय असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही आजही कित्येकांची फेवरेट आहे.
-
‘बाहुबली’सारख्या चित्रपटातून तिचं सौंदर्य आणि तिचा तगडा अभिनय याचे बरेच लोक चाहते झाले.
-
सध्या मात्र अनुष्का शेट्टी रुपेरी पडद्यापासून लांब आहे. २०२० मध्ये ती शेवटची ‘सायलेंस’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिचा एकही चित्रपट आलेला नाही.
-
गेल्या काही वर्षांत भागमती, सायलेंससारखे चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाल्याने बऱ्याच अभिनेत्रींनी तिला आता मागे टाकलं आहे अशी चर्चा होताना दिसत आहे.
-
पण अनुष्काच्या चाहत्यांनी काळजी करायचं कारण नाही.
-
लवकरच अनुष्काचा ‘मिस शेट्टी मिस्टर पोली शेट्टी’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, अनुष्काने या चित्रपटाचे पोस्टरही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.
-
बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या लोकांच्या लाडक्या ‘देवसेने’साठी हा चित्रपट हीट ठरणं फार गरजेचं आहे.
-
अनुष्काचे चाहते तिच्या या जबरदस्त कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत. (फोटो सौजन्य : अनुष्का शेट्टी / इन्स्टाग्राम)
Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार