-
बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनवले गेले ज्यात मुक्या प्राण्यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच हे चित्रपट त्यांच्यामुळे आजही लक्षात राहतात. या मुक्या प्राण्यांनी काहीही न बोलता चित्रपटात जे करून दाखवलं त्यामुळे चित्रपटा अधिक सुंदर झाले. पण आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारे हे मुके प्राणी कुठून येतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? (फोटो : @animalgurukul/instagram)
-
गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे ‘अॅनिमल गुरुकुल’ आहे. कुत्रा, मांजर, पोपटापासून हत्ती, घोडे, मुंग्यापर्यंत सर्व प्रकारचे प्राणी या गुरुकुलात आहेत. अक्षय कुमारच्या ‘एंटरटेन्मेंट’ चित्रपटातला कुत्रा असो, सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातले हत्ती-घोडा असो किंवा आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा गाढव असो, ते सगळे प्राणी या गुरुकुलातील आहेत. (फोटो :@animalgurukul/instagram)
-
”अॅनिमल गुरुकुल’ नावाचा चित्रपट आणि मालिकांना पाळीव प्राणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आयुब खान यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केला होता, जो आता त्यांचा मुलगा जावेद खान चालवत आहे. ८० च्या दशकात आरके स्टुडिओला कुत्र्याची गरज असताना त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली होती. (फोटो : @animalgurukul/instagram)
-
तिथे प्राण्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना चित्रपटांसाठी तयार करायचे हे लक्षात घेऊन अयुबने ‘अॅनिमल गुरुकुल’ नावाचा हा व्यवसाय सुरू केला. या प्राण्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकही नेमण्यात आल्याचे आयुब यांचा मुलगा जावेद याने सांगितले. (स्रोत: @animalgurukul/instagram)
-
तिथे प्राण्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना चित्रपटांसाठी तयार करायचे हे लक्षात घेऊन अयुब यांनी ‘अॅनिमल गुरुकुल’ नावाचा हा व्यवसाय सुरू केला. या प्राण्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकही नेमण्यात आल्याचे आयुब यांचा मुलगा जावेद याने सांगितले. (फोटो : @animalgurukul/instagram)
-
‘अॅनिमल गुरुकुल’मध्ये असलेल्या प्राण्यांसाठी वनविभागाकडून परवानगी घेतल्याचे जावेद यांनी सांगितले. अनेक प्राण्यांसाठी त्यांना सरकारकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतरच तो बॉलिवूड, टीव्ही, जाहिराती किंवा प्रादेशिक चित्रपटांना पुरवला जातो. (स्रोत: @animalgurukul/instagram)
-
‘अॅनिमल गुरुकुल’मध्ये असलेल्या प्राण्यांसाठी वनविभागाकडून परवानगी घेतल्याचे जावेद यांनी सांगितले. तसेच सरकारी परवानगी मिळाल्यानंतरच ते बॉलिवूड, टीव्ही, जाहिराती किंवा प्रादेशिक चित्रपटांना प्राणी पुरवतात. (फोटो@animalgurukul/instagram)
-
या प्राण्यांच्या मानधनाबद्दल बोलायचे झाल्यास, प्राणी जितका प्रशिक्षित तितकं त्याचं मानधन असतं. कुत्र्यांसह शूटिंगसाठी दिवसाला ७,००० ते १२,०००, मांजरीसह शूटिंगसाठी ४,००० ते ६,००० रुपये आकारले जातात. इतर प्राण्यांसोबत शूटिंगसाठी १,००० रुपयांपासून पैसे घेतले जातात. (फोटो : @animalgurukul/instagram)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…