-
दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या केससंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे.
-
जियाचा प्रियकर सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
-
सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी त्याने सलमान खानच्या एका चित्रपटातून पदार्पण केलं होतं. जिया खान आत्महत्या प्रकरणी २० एप्रिल रोजी विशेष सीबीआय न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.
-
आता उद्या म्हणजेच २८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष सीबीआय न्यायालय जिया खान प्रकरणावर अंतिम निकाल देणार आहे. यामुळेच सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
-
तब्बल १० वर्षांनी या केसचा अंतिम निकाल लागणार असल्याने बऱ्याच लोकांच्या मनात धाकधुकही वाढली आहे.
-
जिया खान ३ जून २०१३ रोजी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आत्महत्येनंतर तिच्या घरातून सहा पानी सुसाइड नोट सापडली होती जी जिया खाननेच लिहिल्याचा दावा करण्यात आला होता.
-
सुरुवातीला या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून दुर्लक्ष करण्यात येत होते, पण नंतर जियाच्या आईने मुलीच्या प्रियकर सूरज पांचोलीवर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर कोर्टानेही सूरजला जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
-
जिया आणि सूरजची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. मग हळूहळू दोघेही एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
-
जियाने जेव्हा तिची आई राबिया हिला सूरजबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा तिच्या आईला फारसा आनंद झाला नाही. मात्र, त्यांनी या यावर काही आक्षेपही घेतला नाही, कारण त्यांना आपल्या मुलीला आनंदात बघायचे होते.
-
जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने तिला असे काही मेसेज पाठवले होते, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरजने जियाला १० मेसेज पाठवले होते, ज्यांची भाषा खूपच वाईट आणि अभद्र होती.
-
आत्महत्येच्या दिवशी जियाने सूरजला अनेकवेळा फोन केला, पण त्याने जियाशी बोलायचं टाळलं. जियाने तिच्या पात्रात सुरज पंचोलीबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. त्याने केवळ जियाला दुख यातनाच दिल्या असल्याचंही जियाने त्या पत्रात लिहिलं होतं. नंतर या पत्रावरूनच प्रचंड गहजब झाला होता.
-
जिया खानची कारकीर्द जास्त मोठी नव्हती. राम गोपाल वर्मा यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेवती मुख्य भूमिकेत होते. जियाने नंतर ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत