-
जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांनंतर सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. ३ जून २०१३ रोजी बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा मुलगा सूरज पांचोली याच्यावर जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. (फोटो: सोशल मीडिया)
-
जियाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहील होती. ज्यात तिने गर्भपात व सूरबद्दलचे काही गौप्यस्फोट केले होते.
-
“हे तुला कसं सांगावं तेच कळत नाही, मी आतून तुटले आहे. तुला माहीत नाही की तू माझ्यावर इतका प्रभाव टाकला आहेस की मी स्वतःला तुझ्या प्रेमात गमावले आहे. तरीही तू माझा रोज छळ केलास. (फोटो: सोशल मीडिया)
-
मी कोणालाही इतके प्रेम दिलं नाही, कोणाची इतकी काळजी घेतली नाही, जितकं तुझ्यासाठी केलं, पण तू मला फसवलं आणि माझ्याशी खोटं बोललास. मला गरोदर राहण्याची भीती वाटत होती, पण तरीही तू माझा छळ केलास. (फोटो: पीटीआय)
-
मी माझं सर्वस्व गमावलं, मी जेवू शकत नाही, झोपू शकत नाही आणि कोणतेही काम करू शकत नाही. त्यामुळे मी या सर्व गोष्टींपासून दूर जात आहे. (फोटो: सोशल मीडिया)
-
तू मला फक्त त्रास दिलास, माझं शोषण केलं, मला शिवीगाळ केली व अत्याचार केला. मला वाटतं की मी ते डिझर्व्ह करत नाही. मला तुझ्याकडून प्रेम आणि वचनबद्धता कधीच दिसली नाही. (फोटो: सोशल मीडिया)
-
तुम्ही मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तुझे आयुष्य फक्त पार्टी आणि मुली होते, पण माझे जीवन फक्त तू आणि माझे काम होते.” (फोटो: सोशल मीडिया)
-
असं जिया खानने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
-
दहा वर्षांनंतर आज २८ एप्रिल रोजी सीबीआय कोर्टाने सूरजची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. (फोटो: सोशल मीडिया)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य