-
अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाडून हा निर्णय देण्यात आला आहे.
-
पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झाल्याचं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं.
-
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ साली जुहूमधील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
-
जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता.
-
तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अभिनेता आदित्य पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
-
जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दौष मुक्तता झालेल्या सूरज पांचोलीबद्दल जाणून घेऊया.
-
सूरज पांचोली हा प्रसिद्ध अभिनेते आदित्य पांचोली व अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा आहे.
-
२०१५ साली ‘हिरो’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टीबरोबर स्क्रीन शेअर केली होती.
-
त्यानंतर ‘सॅटेलाइट शंकर’ या चित्रपटातही तो झळकला होता. २०१९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
जिया खान आत्महत्या प्रकरणाव्यतिरिक्त सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातही सूरज पांचोलीचं नाव समोर आलं होतं.
-
दिशा सालियनच्या आत्महत्येनंतर सूरज पांचोलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोतील मुलगी दिशा असल्याचं म्हणण्यात येत होतं.
-
परंतु, फोटोतील मुलगी दिशा नसून माझी गर्लफ्रेंड तनुश्री असल्याचं सांगत ती भारताबाहेर राहत असल्याचं स्पष्टीकरण सूरज पांचोलीने दिलं होतं.
-
दिशा व सूरजचं अफेअर असून ती गरोदर असल्याच्याही चर्चा होत्या. सूरजने लग्नास नकार दिल्यानंतर दिशाने आत्महत्या केली, ही गोष्ट सुशांत सिंहला माहित असल्यामुळे त्याचा खून केल्याचं म्हटलं गेलं होतं.
-
या संपूर्ण प्रकरणावर सूरजने स्पष्टीकरण देत दिशाला ओळखत नसल्याचं सांगितलं होतं. तसेच सुशांतबरोबरही फार संबंध नसल्याचे तो म्हणाला होता. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य