-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पल्लवी पाटीलला ओळखले जाते.
-
‘रुंजी’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
-
ती कायमच तिच्या मालिकांसह खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
-
पल्लवी पाटीलने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील ‘त्या नंतर सगळं काही बदललं’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
यावेळी तिने तिचे आई-वडील, तिचे बालपण, आयुष्यात आलेले अनेक उतार-चढाव, हिंदी सिनेसृष्टीतील काम याबद्दल भाष्य केले.
-
नुकतंच तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आणि बोल्ड फोटो परिधान करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली.
-
पल्लवी पाटीलने अभिनेता संग्राम समेळबरोबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
-
पण त्या दोघांचेही नातं फार काळ टिकलं नाही.
-
त्या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
-
पल्लवीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर संग्रामने दुसरे लग्न केले.
-
याचदरम्यान पल्लवीने एक बोल्ड फोटोशूट करत त्याचे फोटो शेअर केले होते.
-
यावरुन ती चर्चेत आली होती. आता तिने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
-
“संग्राम दुसरं लग्न करतोय, हे मला त्याने सांगितलं होतं.”
-
“पण केव्हा करतोय याची मला अजिबात माहिती नव्हती.”
-
“मी माझ्या कुटुंबाबरोबर फिरायला गेले होते.”
-
“त्यावेळी मी शॉर्टस घालून फोटो टाकले होते.”
-
“ते फोटो टाकण्याची वेळ आणि संग्रामचं लग्न ही वेळ इतकी अचूक जुळून आली होती.”
-
“त्यावेळी मला ही किती चुकीची वेळ आहे, असे वाटलं.”
-
“मी त्यातला एक फोटो अगोदरच टाकला होता.”
-
“पण तेव्हा त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते.”
-
“फक्त संग्रामचं लग्न होतं आणि माझे फोटो त्यामुळे लोकांना विषय मिळाला”, असे पल्लवी पाटील म्हणाली.
-
दरम्यान संग्राम समेळने श्रद्धा फाटकबरोबर लग्नगाठ बांधली.
-
ती एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.
-
संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडला होता.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?