-
अतरंगी रॅपर, टिपिकल पुणेरी मुलगा, जादूगर मोहन अशी वेगवेगळी पात्रं आपल्या इन्स्टाग्राम रील्समधून आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या इन्स्टाग्राम स्टार डॅनी पंडित म्हणजेच मुकेश पंडित हासुद्धा एका मध्यमवर्गीय कुटुंबातूनच वर आला.
-
नुकतंच डॅनीने ‘जोश टॉक्स मराठी’मध्ये हजेरी लावली आणि त्याच्या या प्रवासाबद्दल माहीती दिली. आपलं नाव आणि आपण जे करतो ते काम यामध्ये काहीच साधर्म्य नसल्याने त्याने नाव बादलायचा निर्णय घेतला.
-
त्याला बरीच टोपण नावं होती, पण एका व्यक्तीने त्याला सुप्रसिद्ध अभिनेता डॅनी डेन्झोंग्पावरून डॅनी हे नाव ठेवलं होतं. शेवटी त्याने मुकेश ऐवजी हेच नाव पुढे लावायचं ठरवलं.
-
डॅनीला लहानपणापासूनच असे व्हिडिओज करायची आवड होती. घरी आपल्या मोठ्या ताईचा मोबाइल घेऊन असेच व्हिडिओ करायला त्याने सुरुवात केली.
-
अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या डॅनीच्या वडिलांचे पानाचे दुकान होते. पण त्यांनी कधीच मोठी स्वप्नं पाहण्यापासून मुलांना अडवलं नाही असे डॅनीनेच सांगितले.
-
आज इन्स्टाग्राम रील्समधून घराघरात पोहोचलेला डॅनी हा वकील आहे. त्याने बी. कॉम आणि एलएलबीबरोबरच कंपनी सेक्रेटरीचंही शिक्षण घेतलेलं आहे.
-
नुकतंच ‘लोकमत’कडून बऱ्याच सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान करण्यात आला, यामध्ये डॅनीचाही सन्मान करण्यात आला होता.
-
अथर्व सुदामे, नील सालेकर यांच्याबरोबरचेही डॅनीचे व्हिडिओज प्रचंड व्हायरल होतात.
-
डॅनीचे सोशल मीडियावर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि दिवसागणिक त्याचा चाहतावर्ग आणखीन वाढत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / डॅनी पंडित)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल