-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेला ओळखले जाते.
-
ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते.
-
उर्मिला कोठारे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी उर्मिलाने एका मुलाखतीत प्रेमाबद्दल वक्तव्य केले होते.
-
उर्मिलाला ‘प्रेमात धोका मिळाल्यानंतर काय करशील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने स्पष्ट मत मांडले होते.
-
उर्मिला कोठारेने काही दिवसांपूर्वी ‘प्लॅनेट मराठी’वरील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमात तिला तिच्या खासगी आयुष्याबरोबर चित्रपटाबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले.
-
त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिली होती.
-
यावेळी उर्मिलाला ‘प्रेम म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला होता.
-
त्यावर ती म्हणालेली, “प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास.”
-
यावर लगेचच याच प्रेमाने जखम दिली तर, असे उर्मिलाला विचारण्यात आले.
-
त्यावर तिने “तर मग काय…, दुसरं प्रेम शोधायचं”, असे उर्मिलाने म्हटले.
-
तिचे हे उत्तर ऐकून अभिनेत्री क्रांती रेडकरसह सर्वजण जोरजोरात हसायला लागले.
-
उर्मिला कोठारेने २०११ मध्ये आदिनाथ कोठारेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते.
-
उर्मिला आणि आदिनाथ या दोघांना १८ जानेवारी २०१८ ला कन्यारत्न प्राप्त झाले.
-
दरम्यान उर्मिला कोठारे लवकरच सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘कंपास’ (Compass) या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
-
या वेबसीरिजमध्ये उर्मिला कोठारे ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
-
यात ती मंजुळा हे पात्र साकारत आहे.
-
(सर्व फोटो – उर्मिला कोठारे/ इन्स्टाग्राम)
