-
महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतून घरोघरी पोहोचलेलं नाव म्हणजे नम्रता संभेराव.
-
आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना नम्रता खळखळून हसवते.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रेमधील तिचे पंच व पात्र प्रेक्षकांना मनसोक्त हसण्यास भाग पाडतात.
-
कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
-
नम्रतानं शिवाजी विद्यालय काळाचौकी येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं.
-
नम्रताने कॉलेजचाच मित्र असलेल्या योगेशशी २०१३मध्ये लग्नगाठ बांधली.
-
दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. नम्रताचा पती योगेश अभिनयसृष्टीत कार्यरत नाही.
-
दोघे कॉलेजमध्ये एकत्र होते, त्यांची चांगली मैत्री होती.
-
शाळेत असताना नम्रताने सांस्कृतिक कार्यक्रम जसे की डान्स, गायन, एकपात्री अभिनय, शुद्धलेखन सारख्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला होता.
-
नम्रता कॉलेजमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. त्यामुळे तिचा अभिनय त्याने पाहिला होता.
-
योगेश नम्रताच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. परंतु, या प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून झाली. सोशल मीडियावर आधी त्याने तिच्याशी मैत्री वाढवली.
-
त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली. त्यानंतर योगेशने नम्रताला प्रपोज केलं.
-
त्यानंतर नम्रताने योगेशला होकार दिला. दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि २०१३मध्ये लग्न केलं होतं.
-
या दोघांना रुद्रराज नावाचा मुलगा आहे. नम्रता पती व मुलाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(फोटो – नम्रता संभेरावच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख