-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना ओळखले जाते.
-
ते दोघेही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात.
-
त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली.
-
नुकताच त्या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले.
-
त्यानिमित्ताने ते दोघेही फिरायला गेले आहेत.
-
विराजस आणि शिवानी या दोघांनीही फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
ते दोघेही मालदीवला फिरण्यासाठी गेले आहेत.
-
यातील एका फोटोत ते दोघेही समुद्राच्या पाण्याची मज्जा घेताना दिसत आहे.
-
तर एका फोटोत विराजस आणि शिवानी एकमेकांकडे रोमँटिक पद्धतीने पाहताना दिसत आहे.
-
विराजसने मालदिवच्या निसर्गरम्य वातावरणाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
-
यात ते दोघेही सुर्योदय, सुर्यास्त यांचाही आनंद घेताना दिसत आहेत.
-
तर शिवानीने बिकिनी परिधान करत फोटोशूट केले आहे.
-
शिवानी या संपूर्ण ट्रीपचा छान आनंद घेत असल्याचे तिच्या फोटोद्वारे पाहायला मिळत आहे.
-
विराजस-शिवानी दोघेही फिहालोही आयलँड रिसॉर्ट (Fihalhohi Island Resort) या ठिकाणी राहत आहेत. (फोटो – फिहालोही आयलँड रिसॉर्ट/ इन्स्टाग्राम)
-
विराजसने या रिसॉर्टमधील रुमची झलकही यानिमित्ताने दाखवली आहे.
-
विराजस आणि शिवानी राहत असलेल्या हे रिसॉर्ट दिसायला अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे. (फोटो – फिहालोही आयलँड रिसॉर्ट/ इन्स्टाग्राम)
-
या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहे.
-
यातील वॉटर व्हिलामध्ये शिवानी आणि विराजस राहत आहेत.
-
ते राहत असलेल्या या वॉटर व्हिलाचे प्रतिदिवसाचे भाडे ६१६ डॉलरपेक्षा जास्त आहे. (फोटो – फिहालोही आयलँड रिसॉर्ट/ इन्स्टाग्राम)
-
भारतीय चलनानुसार हे भाडे साधारण ५० ते ६० हजारांच्या आसपास आहे. (फोटो – फिहालोही आयलँड रिसॉर्ट/ इन्स्टाग्राम)
-
फिहालोही आयलँड रिसॉर्ट राहण्यासाठी तुम्हाला एका दिवसाचे किमान ५० ते ६० रुपये खर्च करावे लागतात.
-
विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला काही महिने आधी बुकींग करावे लागते.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख