-
बॉक्स ऑफिसवर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने कमाल दाखवली आहे. कोणताही स्टार नसताना हा चित्रपट पाहायला लोकांनी तिकीटबारीवर गर्दी केली आहे. या चित्रपटाच्या विषयामुळे आणि यातील आकडेवारीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. काही ठिकाणी या चित्रपट प्रदर्शनावर बंदी आणायची मागणी केली गेली, पण अखेर प्रेक्षकांनी यासाठी गर्दी केली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचं कौतूक केलं आहे. केरळमधील धर्मांतरण आणि लव्ह जिहादवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात दाहक वास्तव दाखवण्यात आलं आहे.
-
ही गोष्ट ३ मुलींच्या जीवनावर बेतलेली आहे ज्यांचं धर्मांतरण करून त्यांना आयसीसमध्ये भरती करण्यात आलं. त्यापैकी मुख्य पात्र हे अभिनेत्री अदा शर्मा हिने साकारलं आहे. अदाच्या अभिनयाचं प्रचंड कौतूक होत आहे.
-
याबरोबरीनेच चित्रपटात आसिफा हे नकारात्मक पात्र साकारणारी अभिनेत्री सोनिया बलानी हीसुद्धा चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटात तिचं पात्र या ३ मुलींच्या ब्रेन वॉशिंगमध्ये महत्त्वाचं काम करताना दाखवलं आहे. आसिफ हे पात्र आणि तिचे संवाद प्रेक्षकांना चीड आणणारे आहेत.
-
हे असं नकारात्मक पात्र साकारणारी, चित्रपटातून हिजाबचं महत्त्व पटवून देणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आहे.
-
हे पात्र साकारणारी अभिनेत्री सोनिया बलानी ही टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
तिने ‘डिटेक्टिव दीदी’, ‘बडे अच्छे लगते है’सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे बोल्ड फोटो पाहून लोकांचा यावर विश्वासच बसणार नाही की हीच ती नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री.
-
‘सुरवीन दुग्गल शो’मधून सोनियाने या मनोरंजनक्षेत्रात पदार्पण केलं होतं.
-
त्यानंतर तीने २०१६ च्या ‘तुम बिन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय सैफ अली खानच्या ‘बाजार’ या चित्रपटातही तिने काम केलं.
-
‘द केरला स्टोरी’ हा सोनियाचा तिसरा चित्रपट आहे.
-
अभिनयाबरोबरच सोनिया एक उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रिक आहे.
-
गेली कित्येक वर्षं ती या क्षेत्रात काम करत आहे.
-
‘द केरला स्टोरी’साठी सोनियाला तब्बल ३० लाख एवढं मानधन मिळालं होतं.
-
फोटो सौजन्य : सोशल मीडिया / सोनिया बलानी इंस्टाग्राम

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख