-
छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अमृता देशमुखला ओळखले जाते.
-
बिग बॉसच्या घरात असताना अमृता देशमुखचे नाव अभिनेता अक्षय केळकर आणि प्रसाद जवादे या दोघांबरोबर जोडले गेले.
-
अमृता ही दोघांना डेट करत असल्याचेही बोललं जात होतं.
-
नुकतंच तिने या गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले.
-
त्याबरोबरच आता अमृताने तिच्या आयुष्यात सध्याचे रिलेशनशिप स्टेटस काय? याबद्दलही भाष्य केले.
-
“बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी माझ्या बॉयफ्रेंडचा जो आकडा अगदीच शून्य होता.”
-
“तो तिथे गेल्यानंतर अगदी दोन वैगरे पर्यंत पोहोचला.”
-
“मी घराच्या बाहेर पडल्यानंतर बॉयफ्रेंडच्या आकडेवारीत वाढ वैगरे झाली असं काहीही नाही.”
-
“सध्या माझे रिलेशनशिप स्टेटस कॉम्पलिकेटेड अजिबात नाही.”
-
“कारण मग नकारात्मक अर्थाने होईल.”
-
“पण हो मी आता आयुष्याच्या अशा वळणावर आहे, जिथे मी सध्या माझी गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे.”
-
“पण मी त्याबद्दल खूप बोलून ती आऊट ऑफ कंट्रोल जाऊ देणार नाही.”
-
“सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आलेला आहे असं मी म्हणू शकते.”
-
“मला सोशल मीडियावर काही गोष्टी उघडपणे मांडायला आवडतात.”
-
“पण आता मी सर्व गोष्टी उघड करु शकत नाही”, असे अमृता देशमुखने सांगितले.
-
दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली.
-
‘बिग बॉस’च्या घरातील ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती.
-
ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा कायमच रंगताना दिसतात.
-
मात्र त्या दोघांनीही अद्याप यावर शिक्कामोर्तब केलेला नाही.
