-
गेली अनेक वर्षे अभिनेता भरत जाधव हा त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आला आहे.
-
काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला.
-
गेल्या काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहे.
-
त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्याच्या नाटकाचे प्रयोगही हाऊसफुल होत होते.
-
पण अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते अवाक झाले.
-
आता हा निर्णय घेण्यामागे काय विचार केला होता याचा खुलासा त्याने केला आहे.
-
‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी मी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे.”
-
“त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.”
-
“मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले.”
-
“या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले.”
-
“या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले.”
-
“आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.”
(सर्व फोटो सौजन्य: भरत जाधव/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”