-
अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
अदा शर्माचा आज ३१ वा वाढदिवस आहे.
-
२००८ साली विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
-
त्यावेळी ती फक्त १६ वर्षांची होती
-
या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारही देण्यात आला.
-
यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण तिचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही.
-
त्यानंतर अदाने तेलगु चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला
-
आदाचा पहिला तेलगू चित्रपट ‘हार्ट अटॅक’ २०१४ साली प्रदर्शित झाला होता.
-
यानंतर अदा शर्माने ‘सन ऑफ सत्यमूर्ती’, ‘राणा विक्रम’, ‘सुब्रमण्यम फॉर सेल’ इत्यादी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले.
-
पण तरीही अदा शर्माला ते यश मिळवता आले नाही, जे प्रत्येक अभिनेत्रीला हवे असते.
-
२०१७ मध्ये अदाने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये हात आजमावला.
-
‘कमांडो २’, त्याचा सिक्वेल ‘कमांडो 3’ व्यतिरिक्त त्याने अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटातही काम केले होते.
-
चित्रपटाच्या सरासरी प्रदर्शनानंतरही अदा शर्माच्या भूमिकेची फारशी दखल घेतली गेली नाही.
-
पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने अदा शर्माला एका रात्रीत प्रसिद्धी मिळवून दिली.
-
चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच अदा शर्माच्या अभिनयाची चर्चा सुरू झाली.
-
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच अदाच्या दमदार भूमिकेचे कौतुक करायला भाग पाडले.
-
तब्बल १५ वर्षांच्या संघर्षानंतर अदा शर्माच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक सुरु आहे.
-
छायाचित्र लोकसत्ता

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”