-
इलियाना डिक्रूझ ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
-
इलियाना डिक्रूझने गेल्या महिन्यात इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
-
इलियानाने सोशल मीडियावर आपल्या बेबी बंपचा फोटो शेअर केला होता.
-
काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेलं नाही. त्यानंतर आता इलियानाने गरोदरपणाची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
-
आता पुन्हा इलियानाने बेबी बंप दाखवत एक खास फोटोशूट केलं आहे.
-
मदर्स डेच्या निमित्ताने इलियानानेने खास फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या काळ्या ड्रेसमध्ये इलियाना बेबी बंप दाखवताना अत्यंत आनंदी दिसत आहे.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. याबरोबरच पुन्हा काही लोकांनी तिला “लग्न झालंय का?” किंवा “या मुलाचे वडील कोण?” असं कॉमेंट करत ट्रोलही केलं आहे.
-
इलियाना नुकतीच रॅपर बादशाहच्या नव्या गाण्यात झळकली. त्या गाण्यात तिच्या वाढलेल्या वजनामुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं.
-
आता मात्र इलियाना या नव्या फोटोंमध्ये कामालीची फिट दिसत आहे.
-
फोटो सौजन्य : इलियाना डिक्रूझ / इंस्टाग्राम
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य