-
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता होती.
-
रामायणावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स, व्हीएफएक्स यांचं नेटकरी कौतुक करत आहेत.
-
पण हे सर्व तयार करण्यासाठी या चित्रपटावर बराच मोठा खर्च करण्यात आला आहे.
-
गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली.
-
सर्व बाजूंनी होणारी टीका पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आणि व्हीएफएक्समध्ये बदल करण्यासाठी आणखीन वेळ घेतला. यामुळे या चित्रपटाचं बजेट वाढलं.
-
आधी या चित्रपटाचं बजेट साडेचारशे ते पाचशे कोटींच्या आसपास होतं. पण नंतर या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाचं बजेट निर्मात्यांना वाढवावं लागलं.
-
याचबरोबर या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीदेखील मोठं मानधन आकारलं आहे.
-
या सगळ्यामुळे ‘आदिपुरुष’ हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण ७०० कोटी खर्च करण्यात आले आहेत.
-
ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित