-
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
-
आपल्या कामाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यातही चांगलीच प्रगती करत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं घर घेतलं. तर आता त्या घरामध्ये तिने गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली.
-
प्राजक्ताने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या पूजेचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
जरीचा घागरा परिधान करून तिने स्वतः त्या घरात वास्तुपूजा आणि सत्यनारायणाची पूजा केली.
-
तर तिच्या कुटुंबीयांनी एकत्र या नव्या घरात गृहप्रवेशही केला.
-
पूजा झाल्यानंतर आरती करताना तिने शंखही फुंकला.
-
या पूजेचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये प्राजक्ताने ड्रीम होम, न्यू होम, वास्तुपूजा, सत्यनारायण असे हॅशटॅग वापरले.
-
आता तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले असून यावर कमेंट करून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत तिला शुभेच्छा देत आहेत.

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य