-
शाहरुख खानचा सुपुत्र आर्यन खान ड्रग्स केस पुन्हा चर्चेत आली आहे. समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला फसवण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपामुळे पुन्हा ही केस चर्चेत आली आहे.
-
गेल्याच वर्षी या केसने शाहरुख खानचं जगणं मुश्किल केलं होतं.
-
शाहरुख खानच्या मुलाला या केसमधून सुखरूप बाहेर काढण्याचं काम त्याने नेमलेल्या वकिलांनी तर केलंच, पण यात शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिचादेखील खारीचा वाटा होता.
-
२०१२ पासून पूजा ददलानी शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करत आहे.
-
शाहरुख आणि पूजा या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २ नोव्हेंबरला असतो.
-
तिचे शालेय शिक्षण मुंबईतील बाई आवाबाई फ्रामजी पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून झाले. तिच्याकडे मास कम्युनिकेशनची पदवीही आहे.
-
पूजाने २००८ मध्ये हितेश गुरनानीशी लग्न केले. हितेश हा व्यावसायिक आहे. तो लिस्टा ज्युल्स नावाच्या कंपनीचा संचालक आहे. त्यांना रेना नावाची मुलगीही आहे.
-
शाहरुखच्या चित्रपटांपासून रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीपर्यंत पूजा सगळ्या गोष्टींची काळजी घेते. याशिवाय आयपीएल टीम केकेआरही पूजा सांभाळते.
-
‘डीएनए’च्या एका वृत्तानुसार शाहरुखची सगळी कामं पाहण्यासाठी पूजाला ७ ते ९ कोटी इतके मानधन मिळते.
-
२०२१ च्या एका रिपोर्टनुसार पूजाची संपत्ती ४० ते ५० कोटी असल्याचं म्हंटलं जातं.
-
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली. जोपर्यंत ही केस सुरू होती, तोपर्यंत पूजा आर्यनला भेटण्यासाठी एनसीबी ऑफिस आणि कोर्टात नियमित यायची.
-
ज्या गोष्टीमुळे पूजा सर्वाधिक चर्चेत होती ती म्हणजे आर्यन खान खटल्यातील स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावीला दिलेले ५० लाख रुपये. अद्याप याविषयी कोणताही पुरावा हाती लागलेला नाही पण या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार सॅमने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आर्यन तुरुंगात जाऊ नये म्हणून गोसावी आणि पूजा यांच्यात करार झाला होता.
-
मीडिया रीपोर्टनुसार आर्यनला सोडण्याची किंमत २५ कोटी ठरवण्यात आली होती. गोसावी यांनी पूजाकडून ५० लाख टोकन म्हणून घेतले आणि आर्यन खानला तुरुंगात जाऊ देणार नाही असा करार झाला होता. पण असे झाले नाही. त्यामुळे गोसावी यांना पैसे परत करावे लागले.
-
अर्थात याबद्दल कोणताही सबळ पुरावा नसल्याने पूजा विरोधात कसलीही तक्रार करण्यात आली नाही. उलट आता समोर आलेल्या माहितीनुसार सॅम आणि गोसावी हे दोघेही समीर वानखेडे यांच्या सूचनेनुसार काम करत होते, असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.
-
आर्यन खानला जामीन मिळाल्यावर शाहरुखचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये शाहरुख खान आर्यनची केस हाताळताना कायदेशीर सल्लागारांसह आणि वकिलांसह उभा होता. या फोटोतही पूजा ददलानी शाहरुखच्या शेजारी उभी होती. (फोटो सौजन्य : पूजा ददलानी / इंस्टाग्राम आणि इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”