-
अंडरवर्ल्ड डॉनच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार झाले आहेत. अशा विषयांवर बनलेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांनाही असे चित्रपट आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा आठ चित्रपटांची माहिती देणार आहोत ज्या जित्रपटांची गोष्ट अंडरवर्ल्डवर आधारित आहे.
-
Shootout at Lokhandwala : अडरवर्ल्ड डॉन माया डोळस याच्या जीवनावर आधारित शूटआऊट अॅट लोखंडवाला हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. विवेक ओबेरॉयने यात मुख्य भूमिका साकारली होती. १८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४६ कोटींची कमाई केली होती. (Still from Film)
-
Once Upon a Time in Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि दाऊद इब्राहिमवर आधारित वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगनने हाजी मस्तान याची आणि इम्रान हाश्मीने दाऊदची भूमिका वठवली होती. ३८ कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८५.२ कोटींची कमाई केली होती. (Still from Film)
-
D-Day : डी-डे या चित्रपटात ऋषी कपूर यांनी इक्बाल सेठ उर्फ गोल्डमॅनची भूमिका साकारली होती. इक्बाल सेठ हे पात्र दाऊद इब्राहिमवरून प्रेरित असल्याचं सांगितलं जातं. हा इक्बाल सेठ पाकिस्तानात राहणारा गुंड आहे, जो तिथून भारतात दहशतवादी कारवाया करत असतो. त्याला पकडण्यासाठी भारतीय गुप्तचर अधिकारी एक ऑपरेशन राबवतात. हा चित्रपट इक्बाल सेठ आणि या ऑपरेशनवर आधारित आहे. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. ३६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने २८ कोटींची कमाई केली होती. (Still from Film)
-
Company : कंपनी हा चित्रपट दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या जीवनावर आधारित आहे. यामधील अजय देवगन आणि विवेक ओबेरायचं काम लोकांना खूप आवडलं होतं. ९ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ कोटींची कमाई केली होती. (Still from Film)
-
Haseena Parkar : मुंबईतली माफिया क्वीन म्हणून ओळखली जाणारी हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित Haseena Parkar हा चित्रपट बनला आहे. श्रद्धा कपूर यात मुख्य भूमिकेत दिसली होती. १८ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ८ कोटींची कमाई केली होती. (Still from Film)
-
Gangs of Wasseypur : या चित्रपटात कोळसा माफियांचा रक्तरंजित इतिहास पाहायला मिळतो. तसेच यात १९४७ मध्ये मजुरांवर झालेला अन्याय, नेत्यांची गुंडगिरी आणि घाबरून कारवाई न करणारे पोलीस दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कोळसा माफिया खान आणि कुरेशी कुटुंबांवर आधारित आहे. ९.२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. (Still from Film)
-
Satya : सत्या हा राम गोपाल वर्माचा एक दर्जेदार चित्रपट आहे. २.५ कोटी रुपयांच्या बजटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने २० कोटींची कमाई केली होती. (Still from Film)
-
Mumbai Saga : १९८० आणि १९९० च्या दशकातली मुंबई आणि तेव्हाचं अंडरवर्ल्ड या चित्रपटात पाहायला मिळेल. ६४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ १६ कोटी कमावले होते. (Still from Film)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?