-
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा झाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. म्हातारपणी आपण कसे दिसू? ते जगाचा शेवट होईल तेव्हा माणसाचे रूप कसे असेल, अशा सगळ्या प्रकारचे फोटो एआयच्या (AI) माध्यमातून बनवता येतात.
-
भारतातील अशाच एका डिजिटल क्रिएटरने भारतीय अभिनेते म्हातारपणी कसे दिसतील हे AI च्या सहाय्याने दाखवायचा प्रयत्न केला आहे. साहिद नावाच्या भारतीय तरुणाने AI च्या सहाय्याने ही कमाल दाखवली आहे. या पहिल्या फोटोमध्ये आपल्याला रणबीर कपूर म्हातारपणी कसा दिसेल याची झलक पाहायला मिळत आहे.
-
रोमान्सचा बादशाह शाहरुख खानच्या म्हातारपणीचा हा लूक पाहून तर लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे, इतके हे चित्र हुबेहूब समोर आलं आहे.
-
यानंतर ग्रीक गॉड म्हणून लोकप्रिय असलेला हृतिक रोशनसुद्धा AI च्या या नवीन अवतारात भन्नाट दिसत आहे.
-
‘झुकेगा नहीं’ म्हणणाऱ्या पुष्पाला म्हणजेच अल्लू अर्जुनला यात ओळखू येणं कठीण झालं आहे.
-
आमिर खान तर त्याच्या म्हातारपणी नक्कीच असा दिसेल अशी खात्री लोकांना वाटत आहे.
-
सलमान खानचा स्वॅग आणि त्याची स्टाईल ही AI ने अगदी हुबेहूब टिपली असून भाईजानचा हा लूक लोकांना आवडला आहे.
-
‘बाहुबली’स्टार प्रभासचं म्हातारपणीचं रूप पाहून बऱ्याच लोकांना मल्याळम स्टार मोहनलाल यांची आठवण झाली.
-
अक्षय कुमार हा म्हातारपणीदेखील इतकाच फिट असेल हे या AI ने तयार केलेल्या फोटोवरुन आपल्या ध्यानात येईल. (फोटो सौजन्य : साहिद – डिजिटल क्रिएटर / ईंस्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख