-
अभिनेत्री गौरी इंगावले ही महेश मांजरेकरांची मानसकन्या आहे.
-
गौरीने तिच्या अभिनय व नृत्यकौशल्याने सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
-
बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘कुटुंब’, ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का-२’, ‘पांघरूण’ अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं.
-
आता गौरीने तिच्या खऱ्या आई-वडिलांसह त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
-
त्यांनी या घराचं वास्तुपूजनही केलं.
-
तिने तिचे आई-वडील व नातेवाईक यांच्याबरोबर या नवीन घराची पूजा करतानाचे खास क्षण चाहत्यांशी शेअर केले.
-
या वेळी गौरीने पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता.
-
त्यांचं घर मोठं आहेच, पण या घरच्या भोवती छान अंगणही आहे.
-
या तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी त्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत.
(सर्व फोटो सौजन्य: गौरी इंगावले/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती