-
दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला चंद्रमुखी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेत्री मानसी नाईकचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
-
अमृता खानविलकर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडन दौऱ्यावर असल्याने या पुरस्कार सोहळ्याला ती उपस्थित राहू शकली नाही.
-
अमृताच्यावतीने तिच्या आई-वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला.
-
अमृताने आनंद व्यक्त करीत इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.
-
पोस्ट शेअर करीत अमृताने लिहिले की, “आई-बाबा धन्यवाद.. तुम्ही माझ्यावतीने हा पुरस्कार स्वीकारून माझा आनंद द्विगुणित केलात.”
-
अभिनेत्री मानसी नाईकने सुद्धा इन्स्टाग्रावर पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
ट्रॉफीसह आई-वडिलांचा फोटो शेअर करीत, मानसीने या पुरस्काराचे श्रेय आपल्या पालकांना दिले आहे.
-
मुंबईतील मुकेश पटेल सभागृहात दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कारांचे २० मे रोजी आयोजन करण्यात आले होते.

“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”