-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता दत्तू मोरे नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
-
मंगळवारी २३ मे २०२३ रोजी दत्तूने गुपचूप लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
स्वाती घुनागे असे दत्तूच्या पत्नीचे नाव आहे.
-
दत्तूने पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूटचे काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना याची माहिती दिली.
-
या फोटोमध्ये दत्तू त्याच्या पत्नीबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.
-
या फोटोला त्यांनी “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन दिलं आहे.
-
दत्तूने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे.
-
‘अभिनंदन भावा’, ‘अभिनंदन मित्रा’ अशा कमेंट या फोटोवर पाहायला मिळत आहे.
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य