-
अनेक प्रकारच्या साहसदृष्यांसाठी लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.
-
चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करताना मी रविवारी काम करणार नाही अशी अट अक्षय घालतो.
-
असं असलं तरी त्याने ‘वन्स अप ऑन अ टाइम इन इंडिया टू’ आणि ‘ब्रदर्स’ चित्रपटांचे चित्रकरण पूर्ण करण्यासाठी रविवारी कामं केलं होतं.
-
प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार झाली आहे.
-
मात्र हॉलीवूडमध्ये चित्रपटांचे करार करताना प्रियंका एक अट ठेवली आहे.
-
चित्रपटात ‘न्यूड सीन’ देणार नाही असं प्रियांका करार करण्यापूर्वीच स्पष्ट करते.
-
सलमान खानने कधीच आपल्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिलेले नाही.
-
अशी दृष्ये पाहताना स्रियांनाच नाही तर पुरुषांनाही अवघडल्यासारखे होते असं सलमान सांगतो.
-
तसेच सलमान चित्रपटांमध्ये किसींग सीनही देत नाही. सलमानची आई त्याचे सर्व चित्रपट पाहते त्यामुळेच तो अशी दृष्ये देणे टाळतो.
-
बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानने आत्तापर्यंत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
पण शाहरुखला घोडसवारीची भीती वाटते.
-
त्यामुळे तो चित्रपटांचे करार करताना तो ‘घोडेस्वारी करणार नाही’ अशी अटच ठेवतो.
-
बॉलिवूडची बेबो करीना कपूरने २०१३ साली सैफ अली खानबरोबर लग्न केलं
-
लग्न झाल्यानंतर करीनाने चित्रपटांसंदर्भातील करार करताना एक अट सक्तीची केली आहे.
-
मी कोणतेही किसींग सीन अथवा बेडरुमधील सीन करणार नाही अशी अट करीना चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करताना घालते.
-
कंगना राणावत चित्रपट करण्यापूर्वी निर्मात्यांसमोर एक अट ठेवते
-
चित्रपटांसाठी करारावर स्वाक्षरी करताना चित्रपटाचे शेवटचे दृष्य हे माझ्यावर चित्रित झालेले असावे अशी अट घालते.
-
असं असेल तरच ती चित्रपटाला होकार देते.
-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने सुरुवातील ‘जिस्म टू’ आणि ‘वन नाईट स्टॅण्ड’सारखे बोल्ड चित्रपट केले.
-
मात्र, आता सनीने मोठ्या पडद्यावर किसींग सीन देणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
-
चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करताना सनी ‘नो किसींग’ची अट घालते.
-
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचीही चित्रपट करण्यापूर्वी एक अट आहे.
-
चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी नियोजित दिवसांपेक्षा जास्त काळ लागल्यास अधिकच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागतील अशी अट ऋतिक चित्रपट निर्मात्यांना घालतो.
-
‘जर मी जास्त काम करतो तर मला जास्त पैसे मिळाले पाहिजेत.’ अशी ऋतिकची भूमिका असते.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO