-
‘पठाण’मधून कमबॅक करत शाहरुख खानने दाखवून दिलं की आजही इथला बादशाह तोच आहे. शाहरुख खानने स्वतःच्या मेहनतीवर आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे.
-
शाहरुख खानची सध्याची संपत्ती ही साधारणपणे ५९०० कोटी इतकी आहे, पण तुम्हाला माहितीये का की शाहरुखने चित्रपटांसाठी पैसे घेणं बंद केलं आहे. तरी शाहरुख एवढे पैसे कसे कमावतो? त्याला बिझनेसमधलाही किंग खान का म्हणतात? तेच आपण जाणून घेऊया.
-
एका मुलाखतीमध्ये शाहरुखने हे कबूल केलं की तो पैशांसाठी चित्रपट करत नाही. मीडिया रीपोर्टनुसार चित्रपटाचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन असतं त्यातील ५० – ८०% हिस्सा शाहरुख त्याचं मानधन म्हणून घेतो.
-
शाहरुखला ‘फौजी’ या टीव्ही सिरियलमुळे ओळख मिळाली होती त्यामुळे त्याचं आणि टेलिव्हिजनचं नातं फार जुनं आहे. मध्यंतरी शाहरुखने ‘केबीसी’, ‘क्या आप पाचवी पास से तेज है’, ‘जोर का झटका’सारखे रीयालिटि शोज केले अन् त्यातून त्याला चांगलाच पैसा मिळाला.
-
बरेच सेलिब्रिटीज लग्नात नाचायचे वेगळे पैसे घेतात. शाहरुख खान हादेखील अशाच काही महागड्या स्टारपैकी एक आहे जो एका लग्नात डान्स परफॉर्मन्ससाठी ४ ते ८ कोटी इतकं मानधन घेतो.
-
शाहरुखने स्वतःची ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट ही कंपनी सुरू केली. कंपनीने बरेच चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती केली आहे. शिवाय शाहरुखची ही कंपनी भारतातील उत्तम व्हीएफएक्स संदर्भात काम करणाऱ्या कंपन्यांपैकी आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार या कंपनीचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटींहून अधिक आहे.
-
याबरोबरच शाहरुख खानची त्याच्या आयपीएल संघ ‘कोलकाता नाइट रायडर्स’मध्य कसलीही भागीदारी नसली तरी त्याच्या प्रोडक्शन कंपनीची या संघात ५५% भागीदारी आहे. याचा अर्थ यातून मिळणारं उत्पन्न अप्रत्यक्षरित्या शाहरुखच्याच खिशात जातं.
-
याबरोबरच शाहरुख पेप्सी, व्हर्लपूल, हुंदई, बिग बास्केट, बायजूस अशा वेगवेगळ्या ब्रँडचा अम्बॅसडर आहे. मीडिया रीपोर्टनुसार एखाद्या जाहिरातीच्या शूटसाठी शाहरुख दिवसाचे ३.५ ते ४ कोटी इतके मानधन घेतो.
-
यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की शाहरुखला मिळालेलं ‘बिझनेसचा बादशाह’ हे बिरुद किती समर्पक आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी