-
बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून काम करत आहे.
-
आज २५ मे रोजी कुणाल खेमूचा वाढदिवस आहे.
-
अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कुणाल व अभिनेत्री सोहा अली खानने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
कुणाल व सोहा यांना इनाया ही मुलागी आहे.
-
कुणालने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
-
कुणाल खेमूचा ‘कलयुग’ चित्रपट खूप गाजला होता.
-
कुणाल हा काश्मिरी पंडित आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.
-
१९८९ पूर्वी त्याचे घर काश्मीरमध्ये होते.
-
एका मुलाखतीदरम्यान कुणालने खुलासा केला होता की, ज्या वेळी काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण होते, त्याचवेळी बॉम्बस्फोटात त्याचे घर उडाले होते.
-
कुणालने सांगितले होते की, त्या दिवशी त्याचे बॉम्बस्फोटात उडालेले घर टीव्हीवर दाखवले जात होते.
-
टीव्हीवर त्याचे घर पाहून त्याला खूप आनंद झाला होता
-
कारण त्याला वाटले की त्याचे कुटुंब खूप प्रसिद्ध झाले आहे.
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…