-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत.
-
बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी यांनी ६०व्या वर्षी पुन्हा विवाह केला आहे.
-
आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
या बातमीने त्यांचे चाहते आनंदाने थक्क झाले आहेत. आज आपण आशिष विद्यार्थी यांच्या पत्नी रूपाली यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
-
आशिष व रुपाली यांनी गुरुवारी(२५ मे) कोलकाता येथे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
लग्नानंतर जवळील नातेवाईक व मित्रपरिवारासाठी रिसेप्शन सोहळा ठेवण्यात आला होता.
-
लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या. “या वयात रुपालीशी लग्न करणं, हे फिलिंग खूप छान आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं. संध्याकाळी लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे,” असं ते म्हणाले.
-
आशिष विद्यार्थी यांची पत्नी रुपाली बरुआ या आसामच्या आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्या कार्यरत आहे. कोलकाता येथे त्यांच्या मालकीचं फॅशन स्टोर आहे.
-
रुपाली बरुआ या मूळच्या गुवाहाटीच्या असून त्या कोलकात्याच्या हातमाग फॅशन स्टोअर, NAMEG शी संबंधित आहे.
-
रूपाली आणि आशिष यांच्यामध्ये जवळपास १० वर्षांचा फरक आहे. त्याचप्रमाणे रूपाली यांचं आयुष्य अत्यंत खाजगी आहे. त्यांचे सोशल मीडियावर अतिशय कमी फॉलोवर्स आहेत.
-
आशिष विद्यार्थी यांनी तमिल, मल्याळम, कन्नड अशी ११ हून अधिक भाषांमध्ये काम केलं आहे. जवळपास २०० चित्रपटांत ते झळकले आहेत.
-
‘बिच्छू’, ‘अर्जुन पंडित’, ‘जिद्दी’, ‘बादल’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेला व्हिलन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. (सर्व फोटो : Instagram)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…