-
आमिर खान बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचं वय ५८ वर्ष इतकं असूनही तरुणांना लाजवेल असा फिटनेस आमिरने राखला आहे. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
दररोज व्यायामासह आमिर खान खास डाएट फॉलो करतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमिर हा व्हीगन (शाकाहारी जे दूथ आणि दुग्धजन्य पदार्थही खात नाहीत) आहे. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
आमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून तो व्हीगन झाला. तो पूर्वी पक्का मांसाहारी होता. बिर्याणी आणि मटन कोरमा हे त्याचे आवडते पदार्थ होते. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने आमिरला मांसाहारामुळे आपल्या शरिराचं होणारं नुकसान समजावून सांगितलं. यानंतर आमिरने मांसाहार बंद केलं. किरण ही स्वतः व्हीगन आहे. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
व्हीगन असल्यामुळे आमिर दूथ आणि दुग्धजन्य पदार्थही खात नाही. उत्तम फिटनेससाठी व्हीगन डाएट चांगला पर्याय असल्याचं आमिर सांगतो. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
आमिरच्या डाएट प्लॅनमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन यांचा समान प्रमाणात समावेश आहे. तो कॅलरीजची विशेष काळजी घेतो. ऑफिसला जाताना किंवा पार्ट्यांनाही तो घरचं जेवण घेऊन जातो. शाहरुख खानच्या पार्टीतही त्याने टिफिन नेला होता. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
आमिर खान धुम्रपानापासून दूर राहतो. २०२१ मध्ये सत्यमेव जयते या शोमधून त्याने धुम्रपान सोडल्याचं सांगितलं होतं. तसेच लोकांमध्येही तो जागरुकता निर्माण करण्याचं काम करत आहे. (Source: @amirkhanactor_/instagram)
-
आमिरला फळं खायला आवडतात. व्यायामाच्या आधी तो एक केळ आणि एक सफरचंद खातो. व्यायामादरम्यान तो प्रोटीन शेक आणि लिंबू पाणी पितो. (Source: @amirkhanactor_/instagram)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…