-
यंदाचा ‘आयफा पुरस्कार सोहळा’ गेल्या शनिवारी पार पडला. अबू धाबीमध्ये हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. यामध्ये नेमके कोणाकोणाला पुरस्कार मिळाले आणि कोणत्या चित्रपटाने बाजी मारली ते आपण जाणून घेऊयात.
-
या पुरस्कार सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे कमल हासन. यंदा चित्रपटक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल खास पुरस्कार देऊन कमल हासन यांना सन्मानित करण्यात आलं. संगीतकार एआर रेहमान यांच्या हस्ते हा पुरस्कार कमल यांना देण्यात आला.
-
यानंतर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हृतिक रोशनला ‘विक्रम वेधा’ या चित्रपटासाठी मिळाला. बऱ्याच वर्षांनी पुरस्कार मिळाल्याने हृतिक यावेळी चांगलाच भावूक झाला होता.
-
आपल्या आजोबांच्या आजारपणामुळे आलिया भट्ट या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार आलियाला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी मिळाला. निर्माते जयंतीलाल गडा यांनी आलियाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
-
‘दृश्यम २’ ला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
-
‘ब्रह्मास्त्र’मधील ‘रसिया’ आणि ‘केसरिया’ या दोन्ही गाण्यांसाठी उत्कृष्ट पार्श्वगायक आणि पार्श्वगायिकेचा पुरस्कार अरिजित सिंग आणि श्रेया घोषाला यांना मिळाला.
-
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मौनी रॉय हिला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी मिळाला.
-
तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार अनिल कपूर यांना ‘जुग जुग जियो’साठी मिळाला.
-
इरफानचा मुलगा बाबील खान याला नेटफ्लिक्सच्या ‘कला’ चित्रपटासाठी उत्कृष्ट पदर्पणाचा पुरस्कार मिळाला.
-
यंदाच्या आयफा सोहळ्यात संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बाजी मारली. उत्कृष्ट पटकथा, छायाचित्रण, संवाद असे तांत्रिक विभागातील पुरस्कार या चित्रपटाने पटकावले.
-
आर माधवन याला ‘रॉकेट्री द नांबी इफेक्ट’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
-
इतकंच नव्हे तर रितेश देशमुखच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटालाही त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी खास पुरस्कार देण्यात आला. (फोटो सौजन्य : आयफा / ट्विटर हँडल)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख