-
स्वतःची एक अशी वेगळी राजकीय विचारधारा असूनसुद्धा या संपूर्ण चित्रपटसृष्टीत थाटात काम करणारे काही मोजके अभिनेते आहेत त्यापैकीच एक म्हणजे परेश रावल. आज परेश त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
मुंबईत एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या परेश यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. १९७४ मध्ये कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली.
-
नाटकात तर त्यांनी नाव कामावलंच पण मोठ्या पडद्यावर झळकणं हे त्यांच्या नशिबातच होतं.
-
१९८५ सालात आलेल्या ‘अर्जुन’ या चित्रपटातून परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र १९८६ सालामध्येमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ या चित्रपटाने त्यांना उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळाली.
-
१९९४ मध्ये आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बायोपिकमुळे परेश रावल यांचं नाव सर्वदूर पोहोचलं. देशाततच नव्हे तर परदेशातही परेश यांच्या अभिनयाचं कौतुक झालं.
-
परेश यांनी मिस इंडिया खिताब जिंकणाऱ्या स्वरूप संपत यांच्याशी १९८७ साली लग्न केलं.
-
तेव्हा स्वरूप संपत हे नाव बरंच मोठं होतं आणि परेश रावल हे अजूनही स्ट्रगलच करत होते. तरी स्वरूप यांनी कोणताही संकोच न बाळगता परेश यांच्या मेहनतीवर विश्वास दाखवला अन् त्यांच्याशी लग्नगाठ बांधली.
-
आपल्या स्ट्रगलच्या काळात परेश यांनी ‘बँक ऑफ बरोडा’मध्ये काही काळ नोकरीही केली, पण नंतर कारकुनी कामासाठी आपला जन्म झालेला नसल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला.
-
२००० साली आलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटातील परेश यांची बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका सुपरहीट ठरली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट कॉमेडियनचा पुरस्कारही मिळाला होता.
-
परेश रावल हे भारतीय संसदेचे खासदार होते. भारतीय जनता पक्षासाठी ते कार्यरत होते.
-
परेश हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते आपलं परखड मत व्यक्त करतात, यामुळे ते बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत.
-
खलनायक आणि विनोदी भूमिका साकारण्यात परेश यांचा हातखंडा आहे. ‘बडे मियां छोटे मियां’, ‘दौड’, ‘आक्रोश’, ‘अंदाज अपना अपना’, ‘चाची ४२०’, ‘नायक’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘हलचल’, ‘भूलभुलैया’, ‘वेलकम’, ‘ओह माय गॉड’ या आणि अशा कित्येक चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल