-
सोनाली कुलकर्णी तिचा नवरा कुणाल बेनोडेबरोबर सध्या तुर्कीमधील विविध जागांना भेट देत आहे.
-
अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस तुर्कीमध्ये साजरा केला.
-
वाढदिवसानिमित्त सोनाली तुर्कीला गेल्याने तेथील सुंदर जागांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तुर्कीमध्ये गेल्यावर सोनालीने चक्क साडी नेसून फोटो शूट केले आहे.
-
तुर्कीमधील बलून्स कॅपाडोसिया या प्रसिद्ध जागी सोनालीने नवऱ्यासह भेट दिली.
-
सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
-
मराठमोळ्या अप्सरेने तुर्कीमध्ये जाऊन साडी नेसल्याने नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
“तिकडची पोरं बिघडली असतील साडीतली अप्सरा बघून…”, “खूप सुंदर सोनाली ताई…” अशा कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी सोनालीचे कौतुक केले आहे.
-
सोनालीच्या फोटोवर कमेंट करीत अनेकांनी तिला “दोन हजारांच्या नोटा तिकडून येताना संपवून ये…” असा मजेशीर सल्ला दिला आहे.
-
साडी नेसून केलेल्या फोटो शूटला सोनालीने सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
बलून्स कॅपाडोसिया हे तुर्कीतील प्रसिद्ध ठिकाण असून अनेकजण याठिकाणी बलून राईडचा आनंद घेत फोटोशूट करतात.
-
अभिनेत्री लवकरच ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स