-
चित्रपट सृष्टीतले आणि भारतीय क्रीडा विश्वातले सेलिब्रेटी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. या सेलिब्रेटींना अवघ्या एका इन्स्टा पोस्टसाठी कोट्यवधी रुपये मिळतात. आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रेटींची माहिती देणार आहोत.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे इन्स्टाग्रामवर ७७.४ मिलियन म्हणजेच ७.७४ कोटी फॉलोवर्स आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार आलिया एका प्रोमोशनल इन्स्टा पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेते.
-
कतरीना कैफला इन्स्टाग्रामवर ७.२८ कोटी युजर्स फॉलो करतात. ती एका इन्स्टा पोस्टसाठी १ कोटी रुपये घेते.
-
प्रियांका चोप्राचे ८.७७ कोटी फॉलोवर्स आहेत. ती एका इन्स्टा पोस्टसाठी दोन कोटी रुपये घेते.
-
दीपिका पदूकोण एका इन्स्टा पोस्टचे २ कोटी रुपये घेते. तिला ७४ मिलियन युजर्स फॉलो करतात.
-
क्रिकेटपटू विराट कोहीलचे २५० मिलियन्स म्हणजेच तब्बल २५ कोटी फॉलोवर्स आहेत.
-
विराट कोहली एका इन्स्टा पोस्टसाठी ३.५ कोटी ते ५ कोटी रुपये घेतो.
-
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अनुष्काचे इन्स्टाग्रामवर ६४ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
अनुष्का शर्मा एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ९५ लाख रुपये घेते.
-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर ८०.८ मिलियन म्हणजेच ८ कोटी फॉलोवर्स आहेत.
-
श्रद्धादेखील एका इन्स्टा पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेते.

धनंजय मुंडेंच्या कुटुंबात गृहकलह? आई-भाऊ वेगळे का राहतात? भावानेच केलं स्पष्ट; म्हणाले…