-
अभिनेत्री प्रिया बापट सध्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
प्रियाचे संपूर्ण बालपण दादरमध्ये गेले असून अलीकडेच तिने सर्व आठवणींना उजाळा देणारा एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
दादरमध्ये प्रियाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर आपल्या बालपणीच्या चाळीतल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली.
-
आयुष्यातील पहिला परफॉर्मन्स तिने कुठे सादर केला ती घराखालील जागा प्रियाने आपल्या चाहत्यांना दाखवली.
-
बालपणी प्रिया आणि तिचे कुटुंबीय चाळीतल्या घरात गणपतीसाठी विशेष सजावट करायचे.
-
घरात प्रिया अभ्यासाला कुठे बसायची याची माहिती तिने दिली.
-
बालपणीच्या घरात वावरताना ती अत्यंत खूश होती.
-
प्रियाने संपूर्ण घराचा फेरफटका मारला.
-
चाळीतल्या घराचा जिना चढताना प्रियाला जुने दिवस आठवले.
-
प्रियाने जुन्या घराचा व्हिडीओ शेअर करीत सुंदर असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री म्हणते, “घर, जिथे आपली स्वप्नं फुलतात… मी नशीबवान आहे म्हणून या शहरात माझा जन्म झाला. दादरच्या एका चाळीत मी लहानाची मोठी झाले…आणि आज देशभरातून मला एवढे प्रेम मिळत आहे.
-
“या जागेने, शहराने मला सर्वकाही दिले. मी कायम ऋणी असेन…” असे प्रियाने सांगितले.
-
प्रिया बापटचा प्रवास पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.
-
प्रियाची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा