-
बोनी कपूर यांनी त्यांची पत्नी व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
बोनी कपूर यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे आधी मोना शौरी कपूरशी लग्न झाले होते. त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी दोन मुले होती. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
बोनी यांनी फिल्मफेअरला एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे आणि श्रीदेवीचे जून १९९६ मध्ये लग्न झाले होते. परंतु ते जानेवारी १९९७ मध्ये सार्वजनिक झाले आणि त्यांना खूप टीकेचा सामना करावा लागला. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
आजचा दिवस साजरा करताना, बोनी कपूर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, “आम्ही २ जून १९९६ रोजी शिर्डीत लग्न केले होते. आज आम्हाला २७ वर्षे पूर्ण झाली.” (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
बोनी यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते, “आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. त्यावेळी आम्ही एकमेकांचं सांत्वन केलं आणि एकमेकांना आधार देत ही परिस्थिती हाताळली.” (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूरने एकदा चुकून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या या गुप्त लग्नाचा खुलासा केला होता. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
जान्हवीने चेन्नईतील तिच्या घराचा फेरफटका मारला तेव्हा सांगितले की हे तिच्यासाठी खूप खास आहे. कारण ते घर श्रीदेवीने सजवले होते. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
या घरात जान्हवीच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या दिवसाचे काही फोटो होते आणि ते ‘गुप्त’ प्रकरण असल्याने ते घाबरलेले दिसत होते. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
“हा आई आणि वडिलांच्या लग्नाचा फोटो आहे. हे एक प्रकारचे गुप्त लग्न होते”, असं जान्हवीने म्हटलं होतं. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
“म्हणूनच ते खूप तणावात आहेत. मला माहित नाही की मला असे म्हणायचे होते की नाही,” असंही जान्हवीने नमूद केले. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)
-
फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवीचे निधन होईपर्यंत श्रीदेवी आणि बोनी यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाने दोन दशकांचा टप्पा पार केला होता. (फोटो: बोनी कपूर/इन्स्टाग्राम)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल