-
‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा मराठीतील बहुत प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
-
या चित्रपटातून छत्रपती ताराराणीसाहेब यांचा पराक्रम प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटामध्ये छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
तर याचबरोबर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
-
तर आज ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची पहिली झलक समोर आली आहे.
-
‘ताराराणी’ या चित्रपटामध्ये अभिनेता आशय कुलकर्णी छत्रपती राजाराम महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
या चित्रपटामध्ये अभिनेता सुमित पुसावळे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
-
तर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता स्वप्निल राजशेखर दिसणार आहे.
-
या वर्षाखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं बोललं जात आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा