-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, मुलगा वियान, मुलगी समीशा आणि पती राज कुंद्रा बरोबर परदेश दौऱ्यावर गेली आहे.
-
शिल्पा शेट्टी सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
सध्या लंडनमधील सुंदर फोटो शेअर करीत ती चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
-
शिल्पाबरोबर तिचा पती राज कुंद्राला पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.
-
भारतात शिल्पा शेट्टीबरोबर फिरताना अनेकदा राज कुंद्रा हा फेस मास्क लावूनच बाहेर पडतो.
-
मात्र, लंडन दौऱ्यावर राज कुंद्राला विना मास्क फिरताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
-
“देशाबाहेर गेल्यावर हा मास्क लावायला विसरला कमाल आहे…”, “आता राज कुंद्रामध्ये स्वतःचा चेहरा दाखवण्याची हिंमत आलीये” शिल्पाच्या पोस्टवर अशा कमेंट करीत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
-
अनेकांनी “चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशातून आज मजा करत आहेत” अशा कमेंट करत राज कुंद्रावर टीका केली आहे.
-
दरम्यान, राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. यानंतर सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावून फिरत असल्याचे निदर्शनास आले होते.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड