-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप.
-
अभिनय व विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. पृथ्वीकने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.
-
पृथ्वीकने नुकतंच ‘संपूर्ण स्वराज’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत पृथ्वीकने त्याच्या वडिलांबद्दल भाष्य केलं.
-
पृथ्वीकने आडनाव का लावत नाही? याचं कारणंही स्पष्ट केलं.
-
“मी कांबळे आडनाव काढून टाकलं नाही, पण मी कांबळे आडनाव लावत नाही. त्याची दोन कारणं आहेत,” असं पृथ्वीक म्हणाला.
-
“पहिलं म्हणजे मी जवळपास एक वर्षाचा असताना वडिलांना गमावलं. माझे वडील कसे दिसायचे तेही मला आठवत नाही.”
-
“आता मी काहीतरी चांगलं करतोय. तेव्हा माझे वडील कोण होते, हे लोकांना माहीत असावं ही माझी जबाबदारी आहे,” असंही पुढे त्याने सांगितलं.
-
“खरं तर इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना त्याबद्दलही कळतंच. पण दुर्दैवाने माझे बाबा कुठे पोहोचलेच नाहीत.
-
“ते त्यांच्या तिशीत गेले, त्यामुळे मी प्रतापचा मुलगा आहे हे लोकांना कळावं. कारण त्यांनी मला जन्माला घातलंय आणि त्यांचा मी ऋणी आहे.”
-
“माझ्या कागदपत्रांवर माझं पूर्ण नाव आहे, पण जेव्हा क्रेडिट लिस्टमध्ये नाव येतं तिथे मी पृथ्वीक प्रताप लावतो. कारण लोक तेच नाव जास्त शोधतात,” असं पृथ्वीक म्हणाला.
-
आडनाव न लावण्याचं दुसरं कारण स्पष्ट करत पृथ्वीक म्हणाला, “आडनाव पाहून एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल अजिबात कमीपणा वाटत नाही.”
-
“फरक इतकाच की आडनाव काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून वागवता. आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता.”
-
“आडनाव काढल्यास लोक समोरच्याला नावाने ओळखतील, जात विचारणार नाही. मला पृथ्वीक प्रताप कुठले असं खूपदा विचारतात, मी त्यांना राजस्थान सांगतो.
-
“कारण त्यांचा विचारण्याचा रोख तोच असतो. माझं आडनाव कांबळेऐवजी कांबळी, कुलकर्णी किंवा इतर काहीही असतं तरी मी लावलं नसतं,” असंही त्याने सांगितलं.
-
(सर्व फोटो : पृथ्वीक प्रताप/ इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”