-
सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर – एक प्रेम कथा’ हा चित्रपट तब्बल २२ वर्षांनी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
निमित्त आहे ‘गदर २’ या चित्रपटाचं. लवकरच हा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ ऑगस्टला ‘गदर २’ प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ आणि रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
-
‘गदर’सारख्या चित्रपटासाठी ही नवी बाब नाही, कारण २२ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर असंच एक घमासान बघायला मिळालं होतं. आमिर खानचा ‘लगान’ आणि सनी देओलचा ‘गदर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते आणि दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यादरम्यानचेच काही किस्से आणि माहीत नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
-
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ भारतात टॅक्स फ्री करण्यात आला होता, तसेच भारताकडून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. तर ‘गदर’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. या चित्रपटासाठी लोकांनी बॉक्स ऑफिसवर जी गर्दी केली तशी आजतागयात बघायला मिळालेली नाही.
-
फार कमी लोकांना ठाऊक आहे की ‘गदर’मधील तारा सिंगच्या भूमिकेसाठी प्रथम गोविंदाला विचारणा झाली होती. पण आपण त्या भूमिकेसाठी योग्य नसल्याने गोविंदाने हा चित्रपट नाकारला होता.
-
जेव्हा आशुतोष गोवारीकर ‘लगान’ चित्रपट घेऊन आमिर खानकडे गेला तेव्हा त्याने सर्वप्रथम हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर आशुतोषने शाहरुख खानला ही या चित्रपटासाठी विचारलं होतं. शाहरुखने नकार दिल्यानंतर अखेर आमिरने या चित्रपटात निर्मिती आणि अभिनय करायचा निर्णय घेतला.
-
‘गदर’ आणि ‘लगान’च्या मागे तब्बल ३०० लोकांच्या युनिटची मेहनत होती. दोन्ही चित्रपटात दिग्दर्शक आणि निर्माते यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. ‘लगान’ने बॉलिवूडला एक वेगळी दिशा दिली, तर ‘गदर’ पाहायला येणाऱ्या लोकांचा प्रतिसाद थक्क करणारा होता.
-
‘गदर’च्या सेटवर सनी देओलला पाहून सगळेच घाबरून असायचे. मुख्य अभिनेत्री सनीला एवढी घाबरायची की बऱ्याचदा ती स्वतःचे डायलॉगसुद्धा विसरत असे.
-
‘गदर’चा पहिला शो हा सकाळी सहा वाजता सुरू झाला. यावेळी बऱ्याच ठिकाणी ढोल आणि ताशांच्या गजरात लोकांनी बऱ्याच चित्रपटगृहात गर्दी केली. ‘गदर’ने सर्वात जास्त तिकीटे विकल्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. गावाकडे तर लोक अक्षरशः ट्रकमध्ये भरून चित्रपट पाहायला येत होते.
-
‘गदर’ने ‘लगान’पेक्षा नक्कीच जास्त कमाई केली होती, पण पुरस्कारांच्या बाबतीत मात्र ‘लगान’ने बाजी मारली. ‘गदर’ला केवळ एकच पुरस्कार मिळाला, पण लोकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं.
-
या चित्रपटावरील प्रेम आजही आपल्याला पाहायला मिळत आहे. १५ जून २००१ मध्ये बॉक्स ऑफिसवर जी चुरस पाहायला मिळाली होती तीच आता तब्बल २२ वर्षांनी पाहायला मिळणार का ते येणारी वेळच ठरवेल.
-
११ ऑगस्टला ‘गदर २’, ‘ओह माय गॉड २’ आणि ‘अॅनिमल’ असे तीनही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश