-
‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर लवकरच आई होणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी तिने सुंदर व्हिडीओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
-
तर आता नुकतंच तिचं दोहळे जेवण संपन्न झालं.
-
तिच्या दोहळे जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी राधाने फुलांचे दागिने परिधान केले होते. याचबरोबर एक झोपला फुलांनी सजवण्यात आला होता.
-
या झोपाळ्यावर बसून तिने तिच्या पतीबरोबर पोज दिल्या.
-
तर झेंडूच्या फुलांनी एक धनुष्यबबाणही सजवण्यात आला होता.
-
याचबरोबर एक मोठा चंद्र तयार करून त्याच्या जवळ कृष्णाचा फोटोही लावण्यात आला होता. तर या चंद्राच्या पाठीमागे त्यांचा एक फॅमिली ट्री तयार करण्यात आला होता.
-
डोहळे जेवणाचा कार्यक्रम राधाने खूप एन्जॉय केला.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल