-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड हादरलं.
-
सुशांत सिंह याचा मृत्यूला ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष जाहीर केलेला नाही.
-
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचे धागे दोरे दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशीही जोडले जात आहेत. दिशा सालियन ही सुशांत सिंगची व्यवस्थापक होती.
-
सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस दिशाचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती
-
सुशांतच्या मृत्यूपूर्वी १३ जूनला त्याच्या घरी पार्टी होती. त्यात एक युवा नेता सामील झाल्याचा दावाही करण्यात आला होता.
-
सुशांत सिंगचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका बदलण्यात आली, असा आरोपही करण्यात येतो. पण प्रत्यक्षात सुरुवातीला आलेल्या रुग्णवाहिकेच्या स्ट्रेचर व्हील खराब झाल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यात आली.
-
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगना रणौतने काही व्हिडीओ पोस्ट करुन आरोप केले होते.
-
समाज मााध्यामांवर करण्यात आलेल्या या दाव्यामुळे सुशांत सिंगच्या मृत्यूबाबत संभ्रम आणखी वाढला. तपास मुंबई पोलिसांकडे असताना त्यांनी वेळीच माध्यमांसमोर येऊन या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना अधिक उधाण आले.
-
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली, असा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यासाठी बोट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचे तपासात उघड झाले.
-
सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात मुंबईत पोलिसांनी सुमारे ५६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश आहे.
-
सुशांतने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला होता.
-
मृत्यूपूर्वी सुशांत स्वतःविषयीच्या ऑनलाईन बातम्या, दिशा सालियन व मानसिक आजाराबद्दल सर्वाधिक गुगल सर्च करत होता.
-
सुशांतचा जन्म बिहारमध्ये झाला होता. खगोल शास्त्रात त्याला विशेष रुची होती.
-
सुशांत सिंह राजपूतने विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.
