-
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे जगभरात करोडो चाहते आहेत.
-
लहान मूल असो वा तरुण, ते सलमानची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात.
-
सलमान खान जे काही करतो तो ट्रेंड बनतो.
-
सलमान खानची आणखी एक गोष्ट खूप खास आहे ती म्हणजे त्याच्या हातात असलेलं ब्रेसलेट.
-
चित्रपट असो किंवा आणखी काही सलमान त्याचं हे ब्रेसलेट कधीच हातातून काढत नाही.
-
काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या मित्रांसोबत पनवेल फार्महाऊसवर पार्टी करत होता.
-
त्यावेळी मस्ती- धम्माल करता करता ते ब्रेसलेट कुठेतरी हरवलं
-
त्यानंतर सलमानचा मूड खराब झाला.
-
त्यानंतर त्यानं मित्रांसोबत ते ब्रेसलेट शोधायला सुरुवात केली.
-
शेवटी अश्मित पटेलला ते स्विमिंग पूलमध्ये पडलेलं सापडलं.
-
अखेर ब्रेसलेट सापडल्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावर हसू आलं.
-
त्याने एका मुलाखतीत हे ब्रेसलेट त्याच्यासाठी का एवढं खास आहे हे सांगितलं होतं.
-
तो म्हणाला होता, ‘माझे बाबा पूर्वी अशाप्रकारचं ब्रेसलेट वापरत असत. त्यावेळी मी त्यांच्या ब्रेसलेटसोबत खेळत असे.”
-
“जेव्हा मी मोठा झालो, काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना तसंच एक ब्रेसलेट मला दिलं.
-
यामध्ये असलेल्या खड्याला फिरोजा असं म्हटलं जातं.” असं तो म्हणाला.
-
सलमानच्या ब्रेसलेटमधील निळ्या रंगाचा खडा हा एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ दगड आहे.
-
आपल्याकडे येणारी नकारात्मक उर्जा हा दगड स्वतःकडे खेचून घेतो.
-
त्यामुळे त्यावर वाकड्या रेषा तयार होतात आणि मग त्याला तडा जातो.
-
सध्या माझ्या हातात असलेला हा सातवा खडा आहे.” असं सलमानने मुलाखतीत सांगितलं होतं.
-
फोटो (लोकसत्ता, इंडियन एक्प्रेस, इन्साग्राम)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…