-
अभिनेत्री प्रिया बापटला आज कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. मराठी चित्रपटांसह तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. (Source: @priyabapat/instagram)
-
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सिटी ऑफ ड्रीम्स ३ या वेब सिरीजद्वारे तिने सर्वांची मनं जिंकली आहेत. आता ती रफूचक्कर या वेब सिरीजद्वारे पुन्हा एकदा ओटीटीवर धडकणार आहे. (Source: @priyabapat/instagram)
-
परंतु खूप कमी लोकांना माहिती असेल की, प्रियाने तिच्या कारकीर्दीत असे अनेक चित्रपट नाकारले आहेत ज्याद्वारे ती खूप मोठी स्टार होऊ शकली असती. परंतु ते चित्रपट नाकारल्याचा तिला कोणताही पश्चाताप नाही. (Source: @priyabapat/instagram)
-
प्रिया बापटला शाहरुख खानचा चित्रपट ‘चक दे इंडिया’मधील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. (Source: @priyabapat/instagram)
-
प्रिया बापटने चक दे इंडिया चित्रपट नाकारला होता. हा चित्रपट नकारण्यामागचं कारण ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. (Source: @priyabapat/instagram)
-
प्रियाला चक दे इंडियासाठी विचारणा झाली होती तेव्हा ती पदवीच्या अंतिम वर्षात शिकत होती. (Source: @priyabapat/instagram)
-
चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा आणि तिच्या परिक्षेच्या तारखा सारख्याच असल्याने तिने चित्रपटापेक्षा अभ्यासाला प्राधान्य दिलं. (Source: @priyabapat/instagram)
-
प्रियाने २००० साली प्रदर्शित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाद्वारे अभिनय कारकीर्दिला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर तिने बंदिनी, दामिनी, आभाळ माया या मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. (Source: @priyabapat/instagram)
-
प्रियाने मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात एका विद्यार्थिनीची छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर ती लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातही दिसली होती. (Source: @priyabapat/instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”