-
बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने केलं आहे.
-
गेली अनेक वर्षं तो या चित्रपटावर काम करत होता.
-
दिग्दर्शक म्हणून ओमचा हा तिसराच चित्रपट आहे, तर दुसरा बॉलीवूड चित्रपट आहे.
-
ओम राऊत हा मूळचा मुंबईचा. मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला.
-
ओम राऊतची आई नीना राऊत या निर्मात्या आहेत. आतापर्यंत त्यांनी काही मालिकांची निर्मिती केली आहे, तर ओम राऊतचं दिग्दर्शन असलेला ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ हा चित्रपटही त्यांनी निर्मित केला.
-
ओम राऊत इंजिनीयर आहे. त्याने मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर तो अमेरिकेत जाऊन न्यूयॉर्कध्ये व्हिच्युअल अँड परफॉर्मिंग आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.
-
यानंतर तो मायदेशी परातला आणि सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.
-
सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं. दिग्दर्शक म्हणून हा ओम राऊतचा पहिला चित्रपट होता.
-
त्यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये झेप घेतली. अजय देवगणच्या ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या बिग बजेट चित्रपटाचं दिग्दर्शन ओमने केलं. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
-
तर त्यानंतर आता ‘आदिपुरुष’ या ७०० कोटी बजेट असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे.
-
आतापर्यंत त्याने तीन चित्रपट दिग्दर्शित केले. त्यापैकी दोन चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता त्याचा तिसरा ‘आदिपुरुष’ हा चित्रपटही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा सर्वांना विश्वास आहे.
त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल