-
बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. व्हीएफएक्स व इतर वादांमुळे दोनदा टीझर व ट्रेलरमध्ये बदल करण्यात आले. मात्र तरीही प्रेक्षकांची निराशा झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
-
सोशल मीडियावर लोक चित्रपटावर प्रचंड टीका करत आहे. कथा, व्हीएफएक्स, पात्रांचं सादरीकरण, अभिनय सगळंच लोकांना खटकलं आहे. आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान केल्याची भावना लोकांच्या मनात आहे. आज आपण आदिपुरुषमधील अशाच काही मोठ्या चुकांचा आढावा घेणार आहोत ज्यामुळे यावार प्रेक्षक एवढी टीका करत आहेत.
-
या चित्रपटाची सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे याचे व्हीएफएक्स. या चित्रपटाची सर्वात मोठी युएसपी ‘व्हीएफएक्स’ असल्याने याकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या, पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे व्हीएफएक्स चित्रपटात पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांची फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
-
चित्रपटात सीतेची भूमिका साकारणाऱ्या क्रीती सेनॉनची वेशभूषा ही या चित्रपटाची दुसरी सर्वात मोठी कमकुवत बाजू. स्लीवलेस ब्लाऊज, पांढरी साडी अशा वेशभुषेमुळे प्रेक्षकांनी याबद्दल टीका केली आहे.
-
तिसरी गोष्ट म्हणजे सोन्याच्या लंकेचं सादरीकरण एका कोळशाच्या खाणीप्रमाणे किंवा एखाद्या फॅक्टरीप्रमाणे केल्याचं लोकांचं म्हणणं आहे यामुळेच चित्रपटातील हा भागही लोकांच्या पसंतीस पडलेला नाही.
-
रावण जेव्हा सीतेचं अपहरण करतो त्यावेळी रावणाच्या पुष्पक विमानाऐवजी एक वटवाघूळ सदृश्य प्राणी दाखवल्याने प्रेक्षक चांगलेच खवळले अन् चित्रपटाच्या टीझरपासूनच या गोष्टीचा लोक विरोध करत होते.
-
सीतेप्रमाणेच रावणाचा लूक, हेयरस्टाइल. देहबोली, वेशभूषा हे सगळंच प्रेक्षकांना खटकलं आहे.
-
अशोक वाटीकेमध्ये सीतेला भेटायला हनुमान नमस्कार करण्याऐवजी छातीवर हात ठेवून मुजरा करतो, अन् सीता हनुमानाला चुडामणी ऐवजी स्वतःच्या हातातील बांगडी देते या गोष्टीवरही सोशल मीडियावर खूप वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत.
-
चित्रपटातील हनुमान, रावण यांच्या तोंडी असलेले काही संवाद तर लोकांच्या जिव्हारी लागले आहेत. कोणत्या तरी टपोरी गुंडाप्रमाणे त्यांचे हे डायलॉग प्रेक्षकांना खटकले आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस / सोशल मीडिया)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?