-
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
-
१६ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले.
-
परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’वर प्रेक्षक टीका करत आहेत.
-
असं असलं तरी चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
-
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
-
या चित्रपटाने देशांतर्गत तब्बल ९५-९८ कोटींची गल्ला जमवला आहे.
-
भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी वर्ल्ड वाइड १४० कोटींची कमाई केली आहे.
-
‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याने श्रीराम म्हणजेच राघव ही भूमिका साकारली आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शृर्पणखा ही भूमिका साकारली आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश