-
सैफ अली खान सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात त्याने ‘रावणा’ची भूमिका साकारली आहे.
-
बॉलिवूडच्या महागड्या कलाकारांच्या यादीत त्याची गणना होते.
-
पतौडी कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे त्यांची संपत्ती इतर अनेक स्टार्सपेक्षा खूप जास्त आहे.
-
सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा १०वा नवाब आहे.
-
सैफला वारसामध्ये आलिशान राजवाडा ‘पतौडी पॅलेस’ मिळाला आहे.
-
हरियाणातील गुरुग्रामजवळील पतौडी पॅलेसची रचना १९०० मध्ये इंग्लंडमधील रहिवासी रॉबर्ट टोर रसेल यांनी केली होती.
-
हा राजवाडा पतौडीचे ८ वे नवाब आणि सैफ अली खानच्या आजोबांनी त्यांचा मुलगा आणि ९वा नवाब मन्सूर अली खान पतौडी यांना दिला होता. (स्रोत: @theculturegully/instagram)
-
सैफच्या वडिलांच्या निधनानंतर एका हॉटेल ग्रुपने त्याचा वाडा ताब्यात घेतला होता. (स्रोत: @theculturegully/instagram)
-
सैफच्या वडिलांनी हा बंगला नीमराना हॉटेल्सला भाड्याने दिला होता, ज्यांनी तो ताब्यात घेतला होता (Source: @celebrityspaghetti/instagram)
-
त्यानंतर जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा सैफने भाडेकरार संपवून रक्कम अदा केली आणि पुन्हा घराचा ताबा मिळवला. (फोटो – Myntra Youtube, Indian express Achieve)
-
सैफने पतौडी पॅलेस परत घेतल्यानंतर २०१४ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. (स्रोत: @brunchdudimanche/instagram)
-
त्यांनी मुंबईस्थित वास्तुविशारद आणि इंटिरियर डिझायनरची नियुक्ती केली आणि पॅलेस काही भागांची पुर्ननिर्मिती करण्यात आली. (स्रोत: Myntra/Youtube)
-
या राजवाड्यात एक मोठी बाग, एक मोठा स्विमिंग पूल आणि शेतीसाठी जागा आहे. (स्रोत: Myntra/Youtube)
-
राजवाड्याच्या आत सुमारे १५० खोल्या आहेत ज्यात ७ शयनकक्ष, ७ ड्रेसिंग रूम, ड्रॉइंग रूम आणि एक डायनिंग हॉल आहे. (स्रोत: @theculturegully/instagram)
-
आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या राजवाड्यात मोठे कॉरिडॉर, रॉयल सलून रूम, प्राचीन वस्तू आणि अनेक आलिशान हेरिटेज वस्तू आहेत.
-
सैफच्या या राजवाड्याची पॅलेसची किंमत ८०० कोटी रुपये आहे.
-
याशिवाय या राजवाड्यात मोठमोठे लॉन, व्हिक्टोरियन कारंजे आणि अशा शेकडो गोष्टी आहेत ज्यामुळे या राजवाड्याला अधिक रॉयल लुक मिळतो. (स्रोत: @celebrityspaghetti/instagram)
-
सैफच्या या आलिशान पॅलेसमध्ये तुम्हाला आलिशान आणि अनमोल फर्निचरही पाहायला मिळेल.
-
सैफ अली खानचे हे वडिलोपार्जित घर सुमारे १० एकर परिसरात पसरले आहे.
-
सैफ अली खानचे संपूर्ण कुटुंब नेहमी या राजवाड्यात येत असते आणि वेळ घालवत असतात. (स्रोत: @celebrityspaghetti/instagram)
-
पतौडी पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
-
यामध्ये ‘मंगल पांडे: द रायझिंग’, ‘वीर जरा’, ‘गांधी: माय फादर’ आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या बॉलीवूड चित्रपटांव्यतिरिक्त हॉलीवूडच्या ‘इट प्रे लव्ह’चा समावेश आहे. (स्रोत: @theculturegully/instagram)
-
आदिपुरुष चित्रपटातील सैफच्या भूमिकेबाबत बोलायचं झालं तर चित्रपटातील लूकवरून नेटकऱ्यांनी सैफला ट्रोल केलं आहे.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा