-
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वडिलांसोबतचे काही क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)
-
आज जागतिक फादर्स डे च्या निमित्ताने तिने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या लग्नातील काही क्षणही तिने या फोटोंमार्फत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)
-
ती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये म्हणते की, “तुम्ही समाधानी होत नाही तोवर मी तुमची टाय किंवा तुमचे मोती (गळ्यातील दागिने) व्यवस्थित करेन.” (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)
-
“मी तुम्हाला नाचवेपर्यंत तुमचे हात धरून राहीन”, असंही ती म्हणते. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)
-
“मी तुमच्यासाठी सर्व गोष्टी जिंकून आणत नाही तोवर मी तुम्हाला संयम धरायला सांगेन.” (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)
-
“ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन माझे कितीही हिरो असले तरीही तुम्हीच माझे पहिले हिरो आहात”, असंही सोनालीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बाप-लेकीचे हे फोटो पाहून नेटिझन्सने तिच्या पोस्टवर कॉमेंटचा वर्षाव केला आहे. तुम्हा दोघांचेही डोळे किती अगदीच सारखे आहेत, असं तिच्या अनेक फॅन्सने म्हटलं आहे. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा